esakal | पुणे : शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन हटविले
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन हटविले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत असताना शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ४८ तास आधी आरटीपीसीआर कोरोनाची चाचणी करावी व दर १५ दिवसांनी ही चाचणी केली पाहिजे ही अट शिथिल केली असून, लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण झालेले आहेत, आशांना चाचणी बंधनकारक नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्ट केले आहे.

शहरातील शाळा आजपासून (सोमवारी) सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. पण महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्याची परवानगी देताना त्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी अटी टाकल्या होत्या. त्यामध्ये शाळा सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असेल प्रत्येक १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे असे आदेशात नमूद केले होते. त्याचा फटका शहरातील अनेक शाळांना बसला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना चाचणी करता आली नाही. ज्यांनी केली त्याचा अहवाल प्राप्त झाली नाही. त्यामुळे काही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करण्याची गरज नाही असे सुधारित आदेश आज काढण्यात आले. मात्र ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यास कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top