कोरोनाच्या लढाईत शिक्षक असेही देताहेत योगदान

कोरोनाच्या लढाईत शिक्षक असेही देताहेत योगदान

पौड : कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांप्रमाणेच मुळशी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकही मैदानात उतरले आहेत. शालेय पोषण आहाराचे वाटप, सर्व्हेक्षण, आरोग्य तपासणी, रेशनिंग वाटप करण्यात शिक्षक मग्न आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत व्हॉट्सऍप, यू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ऑनलाईन शैक्षणिक संवादही साधत आहेत.

लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद आहेत. तथापि गरजवंतांची भूक भागविली जावी, यासाठी उरलेला शालेय पोषण आहार वाटप करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी शाळांमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शालेय पोषण आहाराचे वाटप केले. पिरंगुटला कोरोना रूग्ण सापडल्यानंतर येथील शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्याच्या महत्वाच्या ठिकाणी काही शिक्षक ग्रामस्थांची तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणीही करीत आहेत. त्याचप्रमाणे गावातील रेशनिंग दुकानात जावूनही धान्य वाटपासाठी मदत करीत आहेत. 

भूगाव येथे तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिस, डॉक्टरांबरोबर येथील प्राथमिक शिक्षकही येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना निर्जंतुकीकरण कक्षात नेतात. त्यांची थर्मल तपासणी करतात. शिक्षकांनी पहिली ते बारावीच्या विद्यार्थी, पालकांचे व्हॉट्सऍप नंबर घेऊन वर्गनिहाय त्यांचे ग्रुप केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज अभ्यास दिले जातात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही शिक्षक यू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याचप्रमाणे सरकारने मागवलेली माहितीही घरबसल्या ऑनलाईन भरत आहेत. एकंदर लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष कामकाज बंद असले तरी शिक्षक मात्र आपल्या ज्ञानदानाच्या तसेच कोरोनाच्या समाजसेवी कामात मग्न आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com