नागठाणे राज्यस्तरावर यश

नागठाणे राज्यस्तरावर यश

Published on

‘नवोपक्रम’मध्ये गोडसे, पवार, घोरपडेंचे यश

जिल्ह्यातील शिक्षकांची राज्यस्तरावर कौतुकास्पद कामगिरी


नागठाणे, ता. २७ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी भरीव यश संपादन केले. त्यातून साताऱ्याचे नाव राज्यस्तरावर चमकले आहे.

या स्पर्धेत प्राथमिक गटात अंजली शशिकांत गोडसे यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. सध्या कुडाळ (ता. जावळी) येथील प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत. त्या राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. सोनके (ता. कोरेगाव) येथील वरिष्ठ मुख्याध्यापक तुकाराम कृष्णराव पवार यांनी प्राथमिक गटात राज्यात तृतीय क्रमांक संपादन केला. माध्यमिक गटात कुमठे (ता. कोरेगाव) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वृषाली अरुण घोरपडे यांनी राज्यात पाचवा क्रमांक संपादन केला. अंजली गोडसे व वृषाली घोरपडे या दै. ‘सकाळ’च्या ‘उपक्रमशील शिक्षक समूहा’च्या सदस्य आहेत.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण पुण्यात शिक्षण संचालक डॉ. हेमंत वसेकर, सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक इब्राहिम नदाफ, संशोधन विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय थिटे, परीक्षक डॉ. दीपक चांदुरे आदींच्या उपस्थितीत झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी आदींनी यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले.

............
चौकट
............

दमदार कामगिरी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यात सर्वत्र शिक्षक, कर्मचारी अन् अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या. यंदा प्रथमच हा उपक्रम राबविला. त्यात जिल्ह्यातील शिक्षकांनी विविध विभागात राज्यस्तरावर यश संपादन केले. नवोपक्रम स्पर्धेच्या रूपाने त्यांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.

B08220

अंजली गोडसे

वृषाली घोरपडे

तुकाराम पवार
...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com