Pune News : संच मान्यतेचे प्रचलित निकष कायम ठेवण्याच्या मागणीसाठी पुण्यात शिक्षकांचा मोर्चा

शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांच्या प्रत्यक्ष गरजा विचारात घेऊन सरकारने प्रस्तावित संचमान्यता धोरणात तातडीने सुधारणा करावी.
teachers march in pune

teachers march in pune

sakal

Updated on

पुणे - उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित संच मान्यता नको, संच मान्यतेचे प्रचलित निकष कायम ठेवावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. राज्य सरकारच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा यावेळी शिक्षकांनी तीव्र निषेध केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com