
पुणे : महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रश्नांसह अनेक प्रलंबित विषयांवर शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘सकाळ’मध्ये शाळांची विदारक स्थिती मांडलेल्या बातमीचे कात्रण शिक्षकांनी हातात घेऊन आंदोलन केले.