esakal | कोरोनाच्या कामातून कधी सुटका होणार? हवालदिल शिक्षकांचा सवाल!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

शिक्षकांची कोरोनाच्या कामातून सुटका करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.या मागणीनुसार गायकवाड यांनी तशी घोषणा केली आहे.या घोषणेला आता आठवडा झाला आहे

कोरोनाच्या कामातून कधी सुटका होणार? हवालदिल शिक्षकांचा सवाल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरु झाला अन् शिक्षकांच्या कामाचं स्वरूपंच बदलून गेलं. विद्यार्थ्यांना शिकवायचं, हे शिक्षकांचं मूळ काम. पण कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेचं कारण पुढे करत, मागील  पाच महिन्यांपासून शिक्षकांना त्यांचे मूळ कामंच करू दिलं जात नसल्याचे पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सकाळशी बोलताना सांगितले. कोरोनाच्या कामातून सुटका केव्हा होणार आणि विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा? असे सवालही यानिमित्ताने शिक्षकांनी उपस्थित केले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची कोरोनाच्या कामातून मुक्तता करण्याबाबत केलेली घोषणाही तशीच हवेत विरली आहे. गायकवाड यांनी या घोषणेनुसार तसे पत्रही जिल्हा परिषदांना पाठविले आहे. मात्र या पत्राचा सोयीनुसार अर्थ काढत, प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाबाबतचे काम चालूच ठेवले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना प्रतिबंधासाठी शिक्षकांकडे ग्रामीण भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण, स्वस्त धान्य दुकानातून वाटप केल्या जाणाऱ्या अन्नधान्य वितरणाची देखरेख व नियंत्रण करणे, कोवीड केअर सेंटरवरील रुग्णांचा डेटा तयार करणे आणि तपासणी नाक्यावर तपासणी करण्यासाठीची कामे शिक्षकांकडे सोपविण्यात आली होती. उन्हाळी सुट्टीत शिक्षकांनी ईमाने-इतबारे ही कामे केली. पण १५ जूनपासून शाळा आॅनलाइन सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने शिकवावे लागते. मात्र आजही कोरोनाबाबतची कामे चालूच आहेत. त्यामुळे  विद्यार्थ्यांना शिकवायचे की कोरोनाचे काम करायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचेही शिक्षकांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षकांची कोरोनाच्या कामातून सुटका करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार गायकवाड यांनी तशी घोषणा केली आहे. या घोषणेला आता आठवडा झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची कोरोनाच्या कामातून सुटका करण्याबाबतचे पत्रही जिल्हा परिषदांना पाठविले आहे. पण तरीही अद्याप पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची अद्याप कोरोनाच्या कामातून सुटका झालेली नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फक्त शिक्षकच नव्हे तर सर्वच विभागातील कर्मचारी कोरोना प्रतिबंधासाठी लागणार आहेत. यामुळे सरसकट सर्व शिक्षकांना ही कामे न देता गरजेनुसार टप्प्या-टप्याने देण्यात येत आहेत. लॉकडाउनमध्ये अनेक शिक्षक आपापल्या गावाकडे अडकले होते. त्यामुळे पुर्वीच्या शिक्षकांची कोरोनाच्या कामातून सुटका करण्यात आली आहे. 
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील शिक्षकांकडे  कोरोनाच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत दिलेली  जबाबदारी शिक्षकांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पण आता शाळा आॅनलाइन सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना त्यांचे मूळ काम करण्यासाठी कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त केले पाहिजे. 
- दत्तात्रेय वाळूंज, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा शिक्षक संघ, पुणे.

loading image
go to top