
पुणे : राज्य सरकारने १५ मार्च २०२४ मध्ये संच मान्यते संदर्भात घेतलेला शासन निर्णय रद्द करून २८ ऑगस्ट २०१५च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी, एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संस्थाचालक संघटना, विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना एकत्र करून शुक्रवारी राज्यभर एक दिवसीय संप पुकारला.