ajit pawar
sakal
डोर्लेवाडी (बारामती) - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन सोनगाव (ता. बारामती) येथील कऱ्हा-नीरा नदीच्या पवित्र संगमावर सोनेश्वर मंदिर परिसरात पवार परिवाराच्या वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. अस्थी विसर्जनाच्या निमित्ताने सोनगावकर ग्रामस्थांनी आपल्या नेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.