ऑनलाइन सुनावणीत येतात तांत्रिक अडचणी; कशा ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

ऑनलाइन युक्तिवाद कोणत्याही अडथळ्याविना झाला तर त्यातून वेळ वाचू शकतो. मात्र युक्तिवाद करतानाचे अनुभव वेगळेच आहेत. इंटरनेट किंवा तांत्रिक बाबींमुळे बऱ्याचदा ऑनलाइन युक्तिवाद पूर्ण होत नाही. आवाज मध्येच बंद होतो. न्यायाधीश व विरुद्ध पक्षाच्या वकिलापर्यंत आपला युक्तिवाद पोचला नाही तर पुन्हा सर्व मुद्दे मांडावे लागतात.

पुणे - ऑनलाइन युक्तिवाद कोणत्याही अडथळ्याविना झाला तर त्यातून वेळ वाचू शकतो. मात्र युक्तिवाद करतानाचे अनुभव वेगळेच आहेत. इंटरनेट किंवा तांत्रिक बाबींमुळे बऱ्याचदा ऑनलाइन युक्तिवाद पूर्ण होत नाही. आवाज मध्येच बंद होतो. न्यायाधीश व विरुद्ध पक्षाच्या वकिलापर्यंत आपला युक्तिवाद पोचला नाही तर पुन्हा सर्व मुद्दे मांडावे लागतात. आपण दिलेली कागदपत्रे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले की नाही समजत नाही. त्यामुळे आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडता येत नाही, अशी कैफियत ॲड. सुधीर मुळे यांनी मांडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ॲड. मुळे हे जिल्हा न्यायालयात प्रॅक्‍टिस करतात. लॉकडाऊन काळात त्यांनी काही दावे दाखल केले होते. त्यांत युक्तिवाद करताना तांत्रिक अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. मुळे यांनी सामना केलेल्या समस्या अनेक वकिलांनाही भेडसावत आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन काळात न्यायालयात ऑनलाइन कामकाजावर भर देण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार ई-फायलिंग व ऑनलाइन युक्तिवादाचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्यासाठी न्यायालय प्रशासन आणि वकिलांकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने कनेक्‍टिव्हिटीची समस्या निर्माण होत आहे. याचा परिमाण पक्षकारांवर होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे पुढील तारखा मिळत असल्याने त्यांना दिलासा मिळण्यास उशीर होत आहे. सध्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थित महत्त्वाच्या प्रकरणांवर प्रत्यक्षातही सुनावणी सुरू झाली आहे.  

माझ्या विरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्याची नुकतीच तारीख झाली. त्यात वकिलाने सांगितले की ऑनलाइन सुनावणी होऊ न शकल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे. असेच सुरू राहिले तर प्रकरण कधी मिटेल, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया सुलभ व जलद होणे गरजेचे आहे. 
- आनंदा टेंगळे, पक्षकार  

ऑनलाइन सुनावणीतील अडचणी 

  • इंटरनेटची कनेक्‍टिव्हिटी
  • सुनावणी सुरू झाल्यावर आवाज न येणे व व्हिडिओ न चालणे 
  • युक्तिवाद करताना कागदपत्र दाखवणे अवघड 
  • साक्षीपुरावे मांडताना प्रभावी युक्तिवाद करणे मुश्‍कील

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical difficulties come up in online hearings