Pune Sanitation Workers’ Kids Scholarship Row: तांत्रिक गोंधळामुळे कचरावेचकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून वंचित, सात दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा

ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील कचरावेचकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा आरोप; सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास समाजकल्याण आयुक्तालयावर आंदोलनाचा इशारा
The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.

sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : सरकारी अनास्था आणि ऑनलाइन प्रणालीतील गोंधळामुळे कचरावेचकांच्या मुलांच्या शिक्षणावर गदा आली आहे. स्वयंअर्थसहाय्यित (सेल्फ-फायनान्स) शाळांमध्ये शिकणाऱ्या कचरावेचक, मैलावाहक आणि इतर स्वच्छता कामगारांच्या पात्र विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ने (केकेपीकेपी) केला आहे. त्यामुळे या तांत्रिक त्रुटी येत्या सात दिवसांत दूर न केल्यास विद्यार्थ्यांसह थेट समाजकल्याण आयुक्तालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘केकेपीकेपी’ने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com