न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग स्पेक्ट्रम 2026 उत्साहात
TSG26B02017
कोर्टी (ता. पंढरपूर) : येथील न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टेक्नो स्पेक्ट्रम २०२६ चे उद्घाटन करताना विक्रम लोंढे, ज्ञानेश्वर शेडगे आदी.
---
न्यू सातारा पॉलिटेक्निकमध्ये
‘टेक्नो स्पेक्ट्रम’ उत्साहात
३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
तिसंगी, ता. २२ : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला व प्रतिभेला चालना देण्यासाठी ‘टेक्नो स्पेक्ट्रम २०२६’ या तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. न्यू सातारा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांच्या संकल्पनेतून प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रमुख पाहुणे अविनाश सपकाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे व प्राचार्य विक्रम लोंढे उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेझेंटेशन, कॅड वॉर, क्वीझ, पीपीटी मेकिंग अँड प्रेझेंटेशन, गेमिंग व कोडिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रोजेक्ट स्पर्धेत साक्षी बारस्कर, सानिका खटके, तपस्वी देठे व दीक्षा कांबळे विजेत्या ठरल्या. पेपर प्रेझेंटेशनमध्ये अंकिता जाधव विजेती, तर शिवम साळुंखे उपविजेता ठरला. कॅड वॉरमध्ये विजय चव्हाण विजेता ठरला. क्वीझ स्पर्धेत पायल पवार विजेती ठरली. स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना प्राचार्य विक्रम लोंढे व प्राध्यापकांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

