

आळंदी, ता. २४ : बेकायदेशीररीत्या विक्री करता गांजा बाळगल्याप्रकरणी एकावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन मिथुन राजपूत (वय १८, रा. खंडोबा माळ, धानोरे ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपूत याच्याकडे तेरा हजार पाचशे रुपयांचा २७२ ग्रॅम गांजा आढळला.
आळंदी पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (ता. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथील पगडे वस्ती बैलगाडा घाटावर केली. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यामध्ये नारायण सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत याने त्याच्याकडील काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये पानफुले बिया तसेच हिरवट तपकिरी रंगाचा गांजा सदृश अमली पदार्थ जवळ बाळगला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजपूत याच्याकडे विक्रीसाठी आणलेला अनधिकृत गांजा आढळून आला. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.