

KPG26B10563
कोपरगाव ः अटक केलेल्या आरोपीसह पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व पथक कर्मचारी.
अल्पवयीन मुलीची ‘मुस्कान’ अंतर्गत सुटका
कोपरगाव, ता. २० ः लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघींना अटक केली. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली.
मयूर विठ्ठल पवार (वय २०, रा. कारवाडी फाटा, कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३० एप्रिलला सदर मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली होती. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. तपासादरम्यान सदर मुलीस मयूर पवार पळवून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पथकाने पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) परिसरातून मुलीची सुखरूप सुटका केली. पीडित मुलीच्या जबाबातून तपासाला दिशा मिळाली. तिच्या कथनावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. आरोपीस मदत करणारी आई व मावशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मयूर पवार यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.