

अत्याचारप्रकरणी
संशयिताला अटक
पोक्सोसह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा
फलटण, ता. ७ : अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून जादूटोणा केल्याचा बनाव करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित सौरभनाना मदने (रा. बुधवार पेठ, फलटण) याला फलटण शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सोसह जादूटोणाविरोधी कायदा व इतर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मदने याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती. त्याने मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगून जादूटोणा करत ते काढल्याचा बनाव केला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका जुन्या घरात नेले. तेथे आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी इतर ठिकाणी निघून गेली. तेथे एका व्यक्तीने तिला वाई पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
यानंतर पीडितेच्या आईने फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित सौरभनाना मदने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.