माणसातल्या देवासाठी हैदराबाद ते मुंबई पायी वारी

रतन टाटा यांच्या भेटीसाठी व्यंकटेश याची पायपीट; यवतला स्वागत
ratan tata
ratan tatasakal

यवत : तेलंगणातील (telangana) एका खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील एक युवक रतन टाटा (ratan tata) यांना भेटण्यासाठी हैदराबाद येथून पायी निघाला आहे. दररोज चाळीस किलोमीटरची पायपीट करत त्याचा हा प्रवास सुरू आहे. देशावर आलेल्या संकटाच्या काळात नेहमी मदतीचा हात देणारे रतन टाटा हे माणसातील देव आहेत. त्यांना भेटून मला त्यांचे आभार मानायचे आहेत, असे व्यंकटेश गोर्रे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दहा ऑगस्टला व्यंकटेशने हैदराबाद येथून आपल्या पायी प्रवासाला सुरूवात केली. २१ वर्षीय व्यंकटेश हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचा मोठा भाऊ शेती करतो तर वडील रिक्षा चालवतात. तेरा दिवसांत सुमारे पाचशे किलोमीटरचा प्रवास करत तो काल यवत येथे पोहोचला. हातात रतन टाटांचे छायाचित्र आणि पाठीवर कपड्यांची बॅग यांच्यासह त्याचा प्रवास सुरू आहे. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही. कोणी निवारा देऊ केला, कोणी जेवण देऊ केले तर गरजेपुरतेच तो आनंदाने स्वीकारतो.

ratan tata
पुणे : ‘महानगर नियोजन’ची निवडणूक नोव्हेंबरमध्ये?

त्याच्या प्रवासाबाबात व्यंकटेश म्हणाला, लोक भक्तिभावाने देवांच्या वाऱ्या करतात, कोणी बालाजी, कोणी पंढरपूर, कोणी उत्तर भारतात, कोणी कोठे, कोणी कोठे. माझीही भावना तीच आहे. फक्त देव वेगळे आहेत. यापूर्वी याच भावनेने मी कोविड काळात लोकांना मोठी मदत करणाऱ्या सोनूभैय्याचे (सोनू सूद) दर्शन घेतले आहे. तेव्हाही अशीच पायी वारी केलेली आहे. आता रतन टाटांचे दर्शनही त्याच भावनेने घेणार आहे. प्रवासात भेटणाऱ्या लोकांमध्ये टाटांविषयी असलेली कृतज्ञतेची भावनाही मला त्यांच्या पर्यंत पोहोचवायची आहे.

ratan tata
धायरीकरांचा पाण्यासाठी पुणे मनपासमोरच हंडा बाजाव आंदोलन

रतन टाटांना भारत रत्न मिळावे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. माझीही तीच इच्छा आहे. यवत येथे उपसरपंच सुभाष यादव यांनी ग्रामस्थांच्या वतीने व्यंकटेशचे स्वागत केले. येथील मंदिराच्या कार्यालयात त्याच्या मुक्कामाची व्यवस्था केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com