पुणे
बोबडे गटाकडून टेंभुर्णीतील पत्रकारांचा सन्मान
TMB26B03784
टेंभुर्णी ः बोबडे गटाच्या वतीने पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना मान्यवर.
बोबडे गटाकडून टेंभुर्णीतील पत्रकारांचा सन्मान
टेंभुर्णी : पत्रकारदिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील बोबडे गटाच्या वतीने टेंभुर्णी प्रेस क्लब व टेंभुर्णी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा बोबडे गटाचे प्रमुख ऋषिकेश बोबडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश चांदगुडे व टेंभुर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भोसले व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर भरगंडे, पप्पू ताबे, संदीप साळवे, विलास कांबळे,बाळासाहेब खरात, इम्रान बागवान, यश खुर्द, श्रावण खुर्द, पवन स्वामी आदी उपस्थित होते.

