
पुणे : टेमघर धरणग्रस्त शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी वाढीव मोबदला देण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही अद्याप पैसे न मिळाल्याने न्यायालयाने भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश दिला आहे. २८ शेतकऱ्यांना २३ कोटी ७५ लाख रुपयांच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पुढील दोन महिन्यांत मोबदला न्यायालयात जमा करून शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी संध्याकाळी उशिरा कार्यालय सोडले.