Pune Temperature : शिरूरमध्ये तापमानाच्या पाऱ्याची उसळी ; ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद,दहा शहरांमध्ये चाळिशी ओलांडली

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची बुधवारी नोंद झाली. तेथे ४३.२ अंश सेल्सिअस उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल अकोल्यात ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
Pune Temperature
Pune Temperaturesakal

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची बुधवारी नोंद झाली. तेथे ४३.२ अंश सेल्सिअस उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल अकोल्यात ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. राज्यातील दहा शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीच्या पार उसळी मारली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील २८ पैकी १० शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला. त्यात विदर्भातील अकोला, अमरावती (ता. ४१.२), बुलडाणा (४१) आणि वर्धा (४०.५) या चार शहरांचा समावेश आहे. मराठवाड्यातील नांदेड (४०.२) आणि बीड (४०.१), तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव (४१.८), मालेगाव (४२) आणि सोलापूर (४१.३) शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडली. चार वर्षांतील उच्चांकी तापमान पुण्यातील शिवाजीनगर वेधशाळेत बुधवारी ३९.५ अंश सेल्सिअस

तापमान नोंदले गेले. यापूर्वी ३० मार्च २०२३ मध्ये इतकेच तापमान नोंदले होते. गेल्या पाच वर्षांमधील मार्चमधील सर्वाधिक तापमान २०१९ ला ४०.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमधील हे सर्वाधिक तापमान असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

Pune Temperature
Pune : पतसंस्था ठेव संरक्षण योजनेला राज्य फेडरेशनचा विरोध; सरकारने त्रुटींबाबत फेरविचार करावा- काका कोयटे

नोंदलेले उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअस)

२७ मार्च २०२४ ३९.५

२९ मार्च २०२३ ३५.७

३० मार्च २०२२ ३९.५

२९ मार्च २०२१ ३९.३

२४ मार्च २०२० ३७.६

३० मार्च २०१९ ४०.८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com