...म्हणून, मुळशीत आषाढी एकादशीला विठ्ठल रूख्मिणीचे देऊळ बंद

राजेंद्र मारणे, भुकूम
मंगळवार, 30 जून 2020

तालुक्यातील प्रत्तेक गावात विठ्ठल रूखमिणीची मंदिरे आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यावेळी ग्रामस्थ मंदिरात दर्शनाला जात व एकादशीस भजन करत असे. दरम्यान लॉकडाऊन शिथील केल्यापासून कोरोना गावोगावी पोहचला आहे. गाव, परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी देऊळ बंदचा निर्णय घेतला आहे. 

भुकूम : मुळशी तालुक्यात आषाढी एकादिवशीच्या विठ्ठल रूख्मिणीचे देऊळ बंद ठेवण्याचा अनेक गावांनी निर्णय घेतला आहे. तालुक्यात करोनाची संख्या पन्नास पर्यंत गेली असून त्याची भिती गावागावात पसरली आहे. म्हणूनच गावकरी या निर्णयापर्यंत पोहचले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्यातील प्रत्तेक गावात विठ्ठल रूखमिणीची मंदिरे आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यावेळी ग्रामस्थ मंदिरात दर्शनाला जात व एकादशीस भजन करत असे. दरम्यान लॉकडाऊन शिथील केल्यापासून कोरोना गावोगावी पोहचला आहे. गाव, परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी देऊळ बंदचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी तालुक्यातून आषाढी वारीसाठी तीन दिंड्या जातात. तालुक्यात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे.  तसेच किर्तनकार, गायक, पख्वाद वादक यांची संख्या मोठी आहे. यावर्षी करोनामुळे वारी झाली नाही, त्यामुळे वारकरी नाराज झाले. त्यामुळे आषाढी एकादशीस आपल्या गावाच्या मंदिरात किर्तन, भजन करण्याचा मनोदय अनेक वारकरी करत होते. दरम्यानकोरोनावाढू लागल्यामुळे अनेक गावांनी हा निर्णय बदलला आहे. तालुक्यातील प्रती पंढरपूर पौड येथील विठ्ठलवाडी, घावराई डोंगर, आंदगाव येथील विठोबाचा वाडा अशा प्रमुख ठिकाणच्या गावकरींनी हा निर्णय यापूर्वीच सर्वत्र कळविला आहे. त्याचे अनुकरण इतर गावांनीही केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The temple of Vitthal Rukmini the original Ashadi Ekadashi is closed