प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस घेऊन जाणारा टेंम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात

प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस घेऊन जात असताना पोलिसांनी टेंम्पो, चालक व मांस असा 3 लाख 44 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
Crime
CrimeSakal
Updated on
Summary

प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस घेऊन जात असताना पोलिसांनी टेंम्पो, चालक व मांस असा 3 लाख 44 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस घेऊन जात असताना पोलिसांनी टेंम्पो, चालक व मांस असा 3 लाख 44 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी टेंपोचालक, जनावरांची कत्तल करणारे व मांस विकत घेणाऱ्यांविरुध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित बाळासाहेब असवले (वय-29, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वामी चिंचोली (ता. दौंड) हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हाॅटेल माऊली प्युअर व्हेज समोर टेंपोमध्ये (एमएच. 03.ओव्ही-8549) प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या ड्रममध्ये 900 किलो मांस किमत 44 हजार टेंपो किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी टेंपोचालक इमान नासीर शेख (वय-38, रा. 130 सिध्देश्वर पेठ, शहापूर चाळ, सोलापूर) व जनावरांची कत्तल करणारे, मांस विकत घेणारे यांच्याविरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 429, 34 व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com