Manchar Accident : मोटारीची धडक बसून टेम्पो चालकाचा मृत्यू
मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्यावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) मालवाहतूक टेम्पोला मागून येणाऱ्या मोटारीची धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक रोहन काळूराम पोखरकर (वय १९, रा. नांदूर, ता. आंबेगाव) याचा मृत्यू झाला.
याबाबत मंचर पोलिसांनी माहिती दिली की, रोहन पोखरकर हा टेम्पो (क्र. एमएच १४ डीएम ६०२०) घेऊन कळंब गावाकडे जात होता. साई द्वारका पेट्रोल पंपाजवळ मागून आलेल्या मोटारीची (क्र. एमएच १७ डीसी ७३९७) टेम्पोला धडक बसली. त्यामुळे टेम्पो उलटला.
त्यात रोहनच्या डोक्याला, छातीला मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. अपघात पाहून आजूबाजूचे व्यावसायिक व नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी अमित काटे यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मंचर पोलिसांनी मोटारचालक अवधूत दादासाहेब गमी (रा. केळवड, ता. राहता, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार विनोद जांभळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
