
वाघोली - टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याचा मुलगा बचावला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुणे नगर महामार्गावर केसनंद फाट्याजवळ घडला. वाघोली परिसरात पाच दिवसात चार वेगवेगळे अपघात झाले. चारही अपघातात भरघाव चारचाकी वाहनांनी दुचाकीधारकांना उडविले . यामध्ये तीन जणांचा बळी गेला.