
पुणेः महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठी मंगळवारी आणखी दहा गाड्या महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकाकडील गाड्यांची संख्या १८ झाली आहे. त्यामुळे आता शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाईला वेग देण्यास उपयोग होणार आहे.