दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

गेल्या आठवड्यात नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत या आजारावर मात करून खडखडीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या घरात पोचत आहे.

पुणे - पुण्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या गेल्या सात दिवसांपासून सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने शुक्रवारी नोंदविले. गेल्या आठवड्यात नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत या आजारावर मात करून खडखडीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या घरात पोचत आहे. पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो. अर्थात, त्यानंतरही सोशल डिस्टसिंग (एस), मास्क (एम) आणि सॅनिटाझरचा (एस) असा "एसएमएस'चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठ दिवसांत 12 हजार 274 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 775 होती, असे आरोग्य विभागाने प्रसिद्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

सद्य:स्थितीत शहर व जिल्ह्यात एकूण 23 हजार 803 सक्रिय रुग्ण आहेत. 7 ऑक्‍टोबरला रुग्णांचा हाच आकडा 33 हजार 672 होता. म्हणजेच चालू आठवड्यात एकूण 8 हजार 869 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. या आठवड्यात एकूण 72 हजार 834 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात 9 मार्चला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. आज कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 3 लाख 11 हजार 627 झाली आहे. यापैकी 2 लाख 80 हजार 577 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 हजार 335 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दृष्टिक्षेपात पुण्यातील कोरोना उद्रेक 
- एकूण चाचण्या - 13 लाख 17 हजार 84 
- एकूण रुग्ण - 3 लाख 11 हजार 627 
- कोरोनामुक्त - 2 लाख 80 हजार 577 . 
- एकूण सक्रिय रुग्ण - 23 हजार 803 
- आतापर्यंत झालेले मृत्यू - 7 हजार 335 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten thousand corona patients discharge