मयूर कॅालनी - नाटक, सांस्कृतीक कार्यक्रमासाठी शहरात लवकर नाट्यगृह उपलब्ध होत नाहीत, अशी खंत नाट्य कलाकारांनी अनेकवेळा व्यक्त केली. अशी परिस्थिती असताना महापालिकेच्या वतीने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाजूला कै. बाळासाहेब ठाकरे बाल नाट्यगृह उभारण्याचे काम मार्च २०१५ पासून कासवगतीने सुरू आहे.