लग्न समारंभातील मेजवानीत पारंपरिकसह विदेशी पदार्थांकडे कल

लग्न समारंभातील अविभाज्य भाग म्हणजे मेजवानी. त्यात काळानुरूप बदल घडत आहेत.
Marriage food dishes
Marriage food dishesSakal
Updated on
Summary

लग्न समारंभातील अविभाज्य भाग म्हणजे मेजवानी. त्यात काळानुरूप बदल घडत आहेत.

पुणे - लग्न समारंभातील अविभाज्य भाग म्हणजे मेजवानी. त्यात काळानुरूप बदल घडत आहेत. केटरिंग व्यावसायिकांपैकी काहींनी दिलेल्या माहितीनुसार हल्ली आटोपशीरपणाकडे जास्त कल आहे. पारंपरिक पदार्थांबरोबरच देशातील इतर प्रांतातील तसेच काही कॉन्टिनेन्टल डिशेसना मागणी असते.

आपटे रस्त्यावरील श्रेयस हॉटेलचे मंदार चितळे म्हणाले, ‘लग्नात पूर्वी दिसणाऱ्या पंगतींची प्रथा दशकभरापूर्वीच बंद होऊन बफे पद्धत सुरू झाली. आम्ही मात्र वधू-वरांकडच्या मंडळींसाठी खास मानाची पंगत ठेवतो. पारंपरिकता जपत उत्सवमूर्तींसाठी चांदीच्या ताट- वाट्यांमध्ये जेवण वाढतो. लग्न लागल्यानंतरच्या मर्यादित लोकांच्या जेवणासाठी परंपरागत पदार्थ तर संध्याकाळी रिसेप्शनच्या मेजवानीसाठी मल्टिकुझिनची मागणी आम्ही अनेक लग्नामध्ये पुरवली आहे. शेवेची भाजी, कोळाचे पोहे, खरवस, गोळा भात वगैरे आमचे खास पदार्थ मागितले जातात. रिसेप्शनला कॉस्मोपॉलिटिन माणसं निमंत्रित असल्यास वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थांची मागणी केली जाते. काहींना इटालियन अथवा थाई डिशेस हव्या असतात.’

सिंहगड रस्ता परिसरातील सिद्धार्थ कार्यालयाचे गणेश कुलकर्णी यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील मंडळींच्या लग्नसमारंभांमध्ये पूर्वी मसालेभात, अळूची भाजी, बटाट्याची पिवळी भाजी, मठ्ठा, जिलबी यांसारखे पदार्थ अटळ असायचे. अलीकडे या ताटात एखाद दोन पंजाबी पदार्थ मागितले जातात. जिलबीबरोबर राजस्थानी लोकांप्रमाणे रबडीची मागणी केली जाते. बफेचा फायदा असा की, साडेदहाला लग्न लागल्याबरोबर पाच मिनिटांत जेवण वाढून घेऊन सुरू करता येतं. शनिवार-रविवारखेरीज इतर वारी लग्न असल्यास कमी लोक येतात. समजा आलेच तर ऑफिसच्या जेवणाच्या सुटीत भराभर येऊन झटपट जेवण करून जातात.

लॉनवगैरेची टूम जाऊन आता बॅक्विट हॉल किंवा शहराच्या २०-२५ किलोमीटर अंतरावरील रिसॉर्टमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा बोलबाला आहे. अशा लग्नांत कधी पेशवाई थाट किंवा कधी मराठमोळ्या पदार्थांसह राजस्थानी, पंजाबी, गुजराती, उत्तर प्रदेशी पदार्थांची फर्माईश केली जाते. वाटली डाळ, पंचामृत, आंबा अथवा फणसाचं सांदणं, आळूची भाजी अशा खास पारंपरिक मेजवानीची मागणी केली जाते. नुकत्याच झालेल्या लग्नांमध्ये आमरस-पुरीचा बेत लोकप्रिय होता.

- किशोर सरपोतदार, व्यवस्थापक, पूना गेस्ट हाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com