पुणे - वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे कोंढवा-गंगाधाम चौक यादरम्यानचा तीव्र उतार कमी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ती निविदा प्रक्रियाच रद्द केली, त्यामुळेच आज आणखी एका महिलेला जीव गमावण्याची वेळ आल्याचा आरोप महापालिकेवर करण्यात आला.