
पुणे - हडपसर इंडस्ट्रिअल एरियामधील कचरा प्रकल्पांमधील दुर्गंधी घालविण्यासाठी तब्बल ४९ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यावर आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही हरकत घेतली. दुर्गंधी टाळण्यासाठी ५०-६० कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही.