Municipal Commissioner naval kishor ram
sakal
पुणे - शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या ७५ कोटी रुपयांच्या निविदेत ठरावीक ठेकेदारांना पात्र ठरविण्याचा खटाटोप सुरू असल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू झाले होते. आयुक्तांनी केलेल्या छाननीमध्ये अटीशर्तीमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि त्यामुळे न झालेल्या पुरेशा स्पर्धेमुळे आयुक्त नवल किशोर राम यांनी ही निविदा थेट रद्द करून तथाकथित एजंटांना जोरदार झटका दिला आहे. आयुक्तांनी आता तीन ऐवजी प्रत्येकी १० कोटींच्या सात निविदा काढून रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे.