दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या | Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

committed suicide
दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

PUNE : दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide)केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. हि घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर येथील काकडे सिटी येथे घडली.

हेही वाचा: कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव

आदी अमित कर्वे (वय 15, रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी, त्याचे आई-वडील व बहिण असे चौघेजण काकडे सिटी परिसरात राहतात. आदीचे वडील एका खासगी बॅंकेत नोकरीस आहेत, तर आई अभिनव शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहिण महाविद्यालयात शिक्षण घेते. आदी जवळच्याच एका शाळेमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते.

हेही वाचा: कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव

सायंकाळी आदीची बहिणी घरी आली, त्यावेळी तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने याबाबत तत्काळ आई-वडीलांना सांगितले. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनाही खबर देण्यात आली. आदीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top