पुरस्कार

पुरस्कार
Published on

‘तेनझिंग नॉर्गे’पुरस्कारासाठी
२० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करा
अहिल्यानगर : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२५ घोषित झाला आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक साहसी वीरांनी आपले नामांकनाचे प्रस्ताव २० ऑगस्ट २०२६ पर्यंत https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप : जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. साहसी क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी एक स्वतंत्र पुरस्कार प्रदान केला जातो. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील म्हणजेच २०२३, २०२४ व २०२५ मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम जमीन, पाणी आणि हवेमधील असावेत. खेळाडूंची कामगिरी अतिशय उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com