पुण्यात भीषण अपघात! हेल्मेट चक्काचूर, तरुणाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road accident

पुण्यात भीषण अपघात! हेल्मेट चक्काचूर, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे: सनसिटीजवळील नदीपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. अपघातामध्ये तरुणाचं हेल्मेटचा चक्काचूर झाला असून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुबंई-बंगळूर महामार्गावर पुण्यातील वारजे नदीवरील पुलावरून पुढे आल्यावर सनसिटीकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी चालक व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सिंहगड वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, हेल्मेट घातलेले असतानाही दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. दुचाकी व हेल्मेटचा अक्षरश: चुराडा झाला आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsaccident
loading image
go to top