‘उडणाऱ्या कार’च्या नोंदणीला सुरुवात

‘उडणाऱ्या कार’च्या नोंदणीला सुरुवात
Published on: 

‘उडणाऱ्या कार’च्या नोंदणीला सुरुवात

‘टेस्ला’ संकेतस्थळावर घोषणा; अंतिम किंमत निश्चित नाही

नवी दिल्ली, ता. १९ : ‘टेस्ला’ने नुकतीच सर्वांसमोर आणलेली ‘उडणारी कार’ अर्थात रोडस्टर मोटारीसाठी भारतामध्ये नोंदणी सुरू केली आहे. उजव्या बाजूने चालविण्यात येणाऱ्या मोटारीचे उत्पादन, अंतिम किंमत आणि ही मोटार भारतीय ग्राहकांना कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘टेस्ला’ने रॉकेटच्या साह्याने हवेमध्ये उडणाऱ्या मोटारीची जाहीर चाचणी घेतली होती. त्यानंतर या मोटारीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ‘टेस्ला’च्या भारतीय संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ‘परफॉर्मन्स’ आवृत्तीसाठी ५.०१ लाख रुपयांनी नोंदणी होते आणि त्यानंतर १० दिवसांमध्ये ४५.०५ लाख रुपये भरावे लागतात. विशेष थ्रस्ट आवृत्तीसाठी सुरुवातीला ५.०१ लाख रुपये भरावे लागतील आणि १० दिवसांमध्ये दोन कोटी ४५ लाख २४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. विशेष म्हणजे ही नोंदणीची रक्कम असून, मोटारीची अंतिम किंमत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘टेस्ला’ने नोंदणीला सुरुवात केली असली, तरी ही मोटार भारतीय ग्राहकांना कधी मिळेल, याविषयी निश्चित तारीख सांगितलेली नाही. मोटारींचे उत्पादन २०२८मध्ये सुरू होईल, असे कंपनीने सांगितले आहे. सुरुवातीला डाव्या बाजूने चालविता येणाऱ्या मोटारींचेच उत्पादन करण्यात येणार आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेसाठी महत्त्वाच्या उजव्या बाजूने चालविता येणाऱ्या मोटारींच्या उत्पादनांविषयी कंपनीने स्पष्ट काही सांगितलेले नाही. भारतामध्ये या मोटारींची थ्रस्ट व रॉकेट प्रणाली ही नियमनाच्या चौकटीवरच अवलंबून असेल, असे सांगण्यात येते.

प्रत्येक अमेरिकी मुलाला ‘स्पेसएक्स’चा शेअर
वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला ‘स्पेसएक्स’चा एक शेअर देणार असल्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. आपल्या समभागांचा काही हिस्सा सार्वजनिक हितासाठी राखून ठेवणार असल्याचे अँथ्रोपिक या कंपनीने जाहीर केल्यानंतर मस्क यांनी ही घोषणा केली आहे. हे शेअर्स नेमके कशा पद्धतीने वितरित केले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या अंदाजानुसार, देशात सुमारे सात कोटी २० लाख मुले आहेत. ‘स्पेसएक्स’च्या एका शेअरची सध्याची किंमत १४६ डॉलर गृहीत धरल्यास, सर्व मुलांना प्रत्येकी एक शेअर देण्यासाठी सुमारे १०.५ अब्ज डॉलर किमतीचे समभाग लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com