पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५’ येत्या २३ नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेचा अर्ज करण्यास परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता परीक्षार्थींना येत्या गुरुवारपर्यंत (ता. ९) परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.