TET Exam घोटाळा : आरोपीकडून ४ किलो चांदी, २ किलो सोनं आणि हिरे जप्त

TET Exam घोटाळा :  आरोपीकडून ४ किलो चांदी, २ किलो सोनं आणि हिरे जप्त
Summary

टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी आणखी घबाड जप्त केलं आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी आणखी घबाड जप्त केलं आहे. याआधी तकाराम सुपेकडे (Tukaram Supe) तब्बल पावणेचार कोटींचा ऐवज सापडला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या (Pune Police) पथकाने याच प्रकरणात आरोपी असलेल्या अश्विन कुमार (Ashwin Kumar) याच्या बंगळुरूतील घरातून २४ किलो चांदी, दोन किलो सोनं आणि हिरे जप्त केले. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी (GA Software) या कंपनीचा अश्विन कुमार हा प्रमुख आहे.

TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विनकुमारच्या बंगलोरच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये २ किलो सोने आणि २४ किलो चांदी जप्त करण्यात आली. अश्विन कुमार हा जीए सॉफ्टवेअरचा संचालक असून त्याच्याकडून सोने, चांदीसह काही हिरेही पोलिसांनी जप्त केले आहेत. यानतंर आता सायबर क्राइमचे पथक बेंगलोरहून पुण्याकडे रवाना झाले आहे.

याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रितीश देशमुख याला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर महाराष्ट्रा राज्य परीक्षा परीषदेच्या आजी-माजी आयुक्तांवर अटकेची कारवाई कऱण्यात आली.

TET Exam घोटाळा :  आरोपीकडून ४ किलो चांदी, २ किलो सोनं आणि हिरे जप्त
लोणावळ्यात थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल

टीईटी प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्य पऱीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या काही मालमत्तांवर छापा टाकण्यात आला होता. यात सुपेच्या नातेवाईकाकडून शुक्रवारी ३३ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. आतापर्यंत पुणे पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास ३ कोटी ८८ लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. काही पैसे हे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरीही लपवून ठेवण्यात आले होते. सुपेची शिक्षण विभागातील कारकिर्दसुद्धा वादग्रस्त राहिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com