‘त्या’ शिक्षकांनाही टीईटी बंधनकारकच

‘त्या’ शिक्षकांनाही टीईटी बंधनकारकच
Published on

छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : वर्ष २००१ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायाधीश आबासाहेब डी. शिंदे यांनी दिला. टीईटीची अट शिथिल करावी, या मागणीसाठी रघुनाथ शंकर झावरे यांच्यासह ५७ शिक्षकांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.
वर्ष २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीची अट लागू होत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. यासाठी कोल्हापूर खंडपीठाच्या २९ जुलै च्या रामदास शामराव सोळस्कर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील निकालाचा आधार घेण्यात आला. मात्र, हस्तक्षेप अर्जदार योगेश बारकू बोरसे आणि इतरांच्या वतीने ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निकालांचा दाखला देत पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. कोल्हापूर खंडपीठाच्या निकालावेळी हा निर्णय निदर्शनास आणून देण्यात आला नव्हता, असेही खंडपीठाने नमूद केले. या आधीच्या निवाड्यांचा विचार करून खंडपीठाने २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे टीईटीच्या अटीला आव्हान देणारी ५७ शिक्षकांची याचिका फेटाळण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh TET Teacher Recruitment Update Advertisement for Eligible Candidates Expected to Be Published Soon
Pavitra Portal teacher recruitment 2026
Karnataka 15000 teacher recruitment 2026
tet exam
Marathi News Esakal
www.esakal.com