घनकचऱ्यापासून उर्जेची निर्मितचा प्रस्ताव

घनकचऱ्यापासून उर्जेची निर्मितचा प्रस्ताव
Published on

टेक्स्टाईल उद्योगांच्या घनकचऱ्यापासून बनणार इंधन
अक्कलकोट रोड एमआयडीसीचा उद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव; कांडी अथवा वीट तयार करणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील टेक्स्टाईल उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून इंधनासाठी उपयुक्त कांडी अथवा वीट तयार करण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास महाराष्ट्रातील टेक्स्टाईल उद्योगांसाठी तो एक आदर्श मॉडेल ठरण्याची शक्यता आहे.
स्थानिक टेक्स्टाईल उद्योजकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे घनकचऱ्यापासून इंधननिर्मितीसाठी मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार मंडळाने या प्रक्रियेसाठीची ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) उद्योजकांना उपलब्ध करून दिली आहे.
या एसओपीनुसार टेक्सटाईल उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून इंधनासाठी उपयुक्त पदार्थ तयार करता येणार आहेत. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोन वर्षे तिमाही तपासणी व तांत्रिक सहकार्यही मिळणार आहे.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास टेक्स्टाईल उद्योगांसमोरील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून, त्यातून पर्यायी इंधननिर्मितीचा लाभही उद्योगांना मिळू शकणार आहे.
---------------------------
चौकट
टेक्स्टाईल उद्योगांची सदस्यतेतून होणार सुटका
सध्या टेक्स्टाईल उद्योगांना घातक कचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र इनव्हायरो पॉवर लिमिटेडची कायमस्वरूपी सदस्यता घेणे बंधनकारक आहे. मात्र, टेक्स्टाईल उद्योगातून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यात प्रामुख्याने धागे व कापसाचे कण असल्याने तो इंधननिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प सुरू झाल्यास उद्योगांची महाराष्ट्र इनव्हायरो पॉवर लिमिटेडच्या सदस्यतेतून सुटका होण्यास मदत होणार आहे.
---------------------------
चौकट
घनकचऱ्याचे रासायनिक विश्लेषण
पीएच - ७.३६
आर्द्रता - १७.१ टक्के
सल्फर - ०.६६ टक्के
कॅलरी ऊर्जा मूल्य - ४४४२ किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम
हॅलोजन पदार्थांचे प्रमाण - ९८.२ मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम
---------------------------
कोट
आम्ही राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडे घनकचऱ्यापासून इंधननिर्मितीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळाल्यास अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत एक मॉडेल प्रकल्प उभारता येणार आहे.
- राजेंद्र कासवा, अध्यक्ष, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com