जन्मभूमी पुण्यातही 'ठाकरे'चे धडाक्यात स्वागत

pune
pune

पुणे : बहुचर्चित ''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा आहे. बाळासाहेबांची जन्मभूमी असलेले पुणे शहर तर याl आघाडीवर आहे. पुण्यातील थिएटरबाहेरही आज जुन्या व नव्या दमाच्या शिवसैनिकांची चित्रपटासाठी गर्दी दिसली.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला आणि संपूर्ण देशभरात आज प्रदर्शित होत असलेला ‘ठाकरे’ चित्रपट बघण्यासाठी शिवसैनिकांसोबत अनेक मान्यवर रसिक आस लावून बसले आहेत. हा चित्रपट शिवसैनिकांना मोफत बघता यावा यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडून, शिवसैनिकांसाठी ठाकरे चित्रपट पुणे शहरातील विजय टॉकीज तसेच सिटीप्राईड कोथरुड या सिनेमागृहातील ‘फस्ट डे फस्ट शो’ बुक केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही यावेळी चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित लावली होती.

सकाळी 9 आणि 11 वाजताचे शो बुक आहेत. यावेळी जे जुने शिवसैनिक आहेत त्यांचा चित्रपट सुरू होण्यापूर्वी सत्कार करण्यात आला. आता चित्रपट कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com