आता झोपडपट्टीत जाऊन करणार लसीकरण

महापालिकेची ३९० ठिकाणी मोहीम; बुकिंगअभावी वंचित राहणाऱ्यांसाठी पाऊल
लसीकरण
लसीकरण Media Gallery

पुणे : १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणात होणारा गोंधळ संपविण्यासाठी १०० टक्के ऑनलाइन बुकींगद्वारे लसीकरण करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. मात्र लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल वापरून स्लॉट बुकिंग करण्यातील अडचणी व त्याचा वापर करता येत नसल्याने झोपडपट्टीतील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट झोपडपट्टीत जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३९० झोपडपट्ट्यांमध्ये ही मोहीम राबविणार आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण पुन्हा सुरू केले आहे. शहरात या गटासाठी ५८ लसीकरण केंद्र आहेत. पहिले दोन दिवस या प्रत्येक केंद्रावर १०० लस उपलब्ध होत्या, त्यातील ऑनलाइन बुकिंगसाठी ७० तर थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी ३० लस होत्या. त्यासाठी १००-१२५ जण रांगेत उभे असायचे. त्यातही ज्यांचा राजकीय वशिला आहे, त्यांनाच केंद्रात घुसवून लस दिली जात असल्याने वाद निर्माण होत होते. त्यामुळे आता १०० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारेच दिली जात आहे. तर ४५ च्या पुढील वयोगटासाठी ऑनलाइन व थेट केंद्रावर जाण्याचा पर्याय खुला आहे.


ऑनलाइन बुकिंग मिळत नसल्याने अनेकांच्या तक्रारी येत आहेत. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसल्याने लस बुक करताना अनेक अडचणी येत आहेत. यामध्ये विशेषतः झोपडपट्टीतील तरुण, महिलांचा समावेश आहे. त्यामुळे थेट केंद्रावर लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पुढील आठवड्यापासून शहरातील झोपडपट्‍ट्यांमध्ये याचे नियोजन केले आहे.

लसीकरण
माझा काय संबंध?, बदनाम का करतात?; अजित पवार यांचा सवाल

सुमारे चार लाख जणांना फायदा
शहरातील ३९० झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे १० लाख नागरिक राहतात. त्यातील ४० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४४ वयोगटातील आहे. सरकारकडून पुरेशा प्रमाणात लस पुरवठा झाला तर महापालिकेची योजना यशस्वी होऊन सुमारे चार लाख नागरिकांना फायदा होईल.

लसीकरणाची आकडेवारी
१८ ते ४४ साठी अपेक्षीत लसीकरण ः २२ लाख
प्रत्यक्षात झालेले लसीकरण ः ४.७९ लाख
लसीकरण न झालेले ः १७.२१ लाख
झोपडपट्टीमधील लाभार्थी ः सुमारे ४ लाख

''१८ ते ४४ वयोगटाचे १०० टक्के आॅनलाइन लसीकरण केले जात असल्याने झोपडपट्टीतील नागरिक वंचित रहात आहेत. त्यासाठी शहरातील ३९० झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी समाजमंदिर व इतर ठिकाणाचा उपयोग केला जाईल.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

''झोपडपट्टीतील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत, मी देखील अद्याप लस घेऊ शकलो नाही. त्यामुळे महापालिका अशी योजना राबवत असेल तर नक्कीच फायदा होईल. मेट्रो व इतर प्रकल्पांसाठी झोपडपट्टीतील नागरिकांचे इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे, त्यांच्यासाठीही लसीकरण झाले पाहिजे.''
- विकी क्षीरसागर, मुंढवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com