esakal | बारामतीत आता प्रशासनच लोकांकडे जाऊन करणार स्वॅब तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत आता प्रशासनच लोकांकडे जाऊन करणार स्वॅब तपासणी

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाचे आक्रमण रोखण्यासाठी आता प्रशासन अँक्शन मोडमध्ये आले असून आता शहर व तालुक्यात गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दोनशे तपासण्यानंतर एकही रुग्ण सापडला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. बारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी गुरुवारी (ता. 10) संयुक्तपणे शहरातील दुकानातील मालक व कर्मचारी यांची अँटिजेन तपासणी केली. आज केलेल्या शंभर तपासण्यामध्ये एकही कोरोना बाधित आढळला नसल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार

दुसरीकडे पोलिसांनीही गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी सुरु केली. आज पोलिसांनी केलेल्या शंभर तपासण्यांमध्येही एकही रुग्ण सापडला नाही. लोकांनी तपासणीला येण्याची वाट पाहत न बसता आता प्रशासनाने लोकांच्या दारात जाऊन तपासणीला सुरवात केली आहे. अधिकाधिक तपासण्या करण्याचे निर्देश शासनाकडून आल्यानंतर आता ही तपासणी मोहिम अधिक गतीमान करण्यात आली आहे. दुकानात मालकांसह कर्मचा-यांचेही स्वॅब तपासले जात आहेत.

हेही वाचा: दिलासा! पुण्यात मृत्यूदरात घट, पिंपरी आज शून्य मृत्यू

आज नगरपालिकेच्या वतीने संतोष तोडकर व समाज कल्याण अधिकारी सचिन खोरे यांनी ही मोहिम राबवली. प्रत्येक कामगारासह मालकांचीही करण्याचा प्रयत्न होणार आहे, कोणी कोरोना बाधित आढळले तर त्याच्यावर उप जिल्हा रुग्णालय येथे उपचार होतील. अँटीजेन किट उपलब्ध होतील तशी तपासणी होणार आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, कोविड सेंटर प्रमुख शाम उपाध्ये, सागर भोसले, किरण साळवे, अनिष मोरे या मोहिमेत सहभागी होते.

हेही वाचा: 'मिशन पुणे': महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

loading image