esakal | आरोग्यदायी उत्सवाची नांदी...
sakal

बोलून बातमी शोधा

pune

आरोग्यदायी उत्सवाची नांदी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हा प्रवाही राहिला आहे. या उत्सवाने कालसापेक्ष बदल केले आहेत. कोरोनाच्या उद्रेकातही बाप्पांचं ऑनलाइन दर्शन हा गर्दी टाळण्याचा प्रभावी मार्ग दिसत आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी स्वीकारलेला ऑनलाइन दर्शनाचा उपाय हा आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याचा गणेशोत्सव हा देशाला दिशा देणारा ठरला आहे. कोरोनाच्या उद्रेकात गणेश मंडळांनी ऑनलाइन केलेले दर्शन हा त्याचाच एक भाग आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात होते. ऑक्सिजन बेडसाठी रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या रांगा लागत होत्या. एकेका रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी रुग्णाचे नातेवाईक धावपळ करत होते. अशा कोरोनाच्या उद्रेकाच्या सावटात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन गणपती दर्शन सुरू केले आहे.

हेही वाचा: Pune : समाजकल्याण विभागात संगणक खरेदीत घोळ

याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रमेश कोरडे म्हणाले, ‘‘गर्दी टाळणे हा कोरोना टाळण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही भाविक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो.’’

डॉ. वैजयंती बनकर म्हणाल्या, ‘‘आज कोरोना आहे, आणखी दहा-पंधरा वर्षांनी दुसरा कोणत्यातरी विषाणूंचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी गणेशोत्सव कसा साजरा करावा, हा प्रश्न पडेल. त्याची तयारी आता आपण करायला हवी. गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात निर्जंतूक करणे हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे.’’

loading image
go to top