'भाजप जाणीवपूर्वक त्रास देतेय; एजन्सीचा वापर विरोधकांवर दबावासाठी'

 Supriya sule
Supriya sule

पुणे : ''राजकारण हे विचारांच असत आणि लोकांच्या सेवेसाठी असतं. आजपर्यंत या देशात एजन्सीचा(Agencies) वापर आपल्या विरोधकां (Opposotion) विरोधात पाहिला नाही, ऐकलेला नाही पण वाचण्यात आला आहे. पण एजन्सीचा गैरवापर हा याचा 'स्टाईल ऑफ ऑपरेशन'(SOP) दिसत आहे.''असा आरोप खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजप सरकारवर(BJP) केला आहे. विधान भवन येथे झालेल्या आढावा बैठक नंतर त्या पत्रकरांशी बोलत होत्या. (The BJP is deliberately using agencies to put pressure on opposition Said Supriya sule)

''भाजप सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण आली होती Ed ची नोटीस आली होती. असा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. सत्तेचा गैरपावर भाजपकडून केला जातं आहे.'' असा आरोपही सुळे यांनी यावेळी केला.

 Supriya sule
पुण्यात निर्बंध 'जैसे थे'; 15 जुलै पर्यंत कॉलेज शाळा बंद

राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानावर Ed ने छापा मारला आहे. दरम्यान, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''महाराष्ट्रात असं राजकारण कधी होतं नाही, महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्याकरता केला नाही, ही नवीन 'SOP' ज्याला म्हणतात ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसतयं. महाविकास आघाडी विकासाचा राजकारण करत आहे. तिसरी लाट कधी येईल यावर चर्चा करत असून त्यापार्श्वभूमीवर आमचं सरकार तयारी करण्यात व्यस्त आहे. आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी काम करत आहोत. आम्ही कधी वैयक्तिक राजकारण करत नाही, कधीही करणार नाही. देशात अडचणी असताना एखादा मोठा पक्ष सुडाचे राजकारण करत आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com