Pune News : ब्रिटिशकालीन चावडीचे होणार सुसज्ज तलाठी कार्यालयात रुपांतर ; ३४ लाखाचा निधी मंजुर

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे 34 लाख रुपये मंजूर झाले
Pune News
Pune Newssakal
Updated on: 

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे 34 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सरपंच सारिका हिंगे व उपसरपंच अनिल हिंगे यांनी दिली. सन १८०० च्या काळात अवसरी बुद्रुक गावाला तालुका दर्जा होता असे अनेक जुन्या कागदपत्रांच्या नोंदीमध्ये आढळून येत आहे बाजारपेठेत ब्रिटिशकालीन चावडी होती ती अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत पडून आहे. त्या जागेवर नवीन सुसज्ज तलाठी कार्यालय व्हावे अशी मागणी ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून करत होते, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते.

काही वर्षांपासून तलाठी कार्यालय हे ग्रामपंचायतच्या छोट्या जागेत कार्यरत असून या तलाठी कार्यालयात अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी या गावांचा महसूल विभागाचे काम चालू असते, मार्च २०२२ मध्ये तलाठी कार्यालय व्हावे या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ पत्रकार जयेश शहा यांनी मंचर येथील उपविभागीय कार्यालयासमोर काही ग्रामस्थांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली त्यानंतर काही काळ जिल्हा नियोजन मंडळाची बैठक न झाल्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष झाले होते काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांची भेट घेऊन हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने सुमारे ३४ लाख रुपये मंजूर केले आहे याबद्दल ग्रामस्थांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Pune News
Pune Traffic Update News: पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना शहरात नो एंट्री, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

तलाठी कार्यालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन दिले होते त्यावेळी श्री. विखे पाटील यांनी लवकरात लवकर या तलाठी कार्यालयासाठी लागणारी सर्व प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची शिवसेनेचे जिल्हा संघटक अजित चव्हाण यांनी सांगितले. भाजपाच्याही वतीने तलाठी कार्यालय होण्यासाठी जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे यांच्या सह तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली होती असे भाजपाचे गुलाब हिंगे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या तिन्ही पक्षाच्या वतीने स्वतंत्ररीत्या सांगण्यात येत आहे कि तलाठी कार्यालयासाठी आम्हीच प्रयत्न केले सर्वसामान्य नागरिक मात्र म्हणत आहे कोणाचेही का प्रयत्न असेना तलाठी कार्यालय झाल्यास बाजारपेठेत वर्दळ वाढेल त्यामुळे व्यवसायांची उलाढाल वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

drought
dilip walse patil
Potters in Ambegaon taluka speed up the making of clay bull pairs for Bail Pola festival.
Dilip Walse Patil
Marathi News Esakal
www.esakal.com