esakal | Pune : मोबाईलच्या नादात कॉंक्रीट मिक्सर पलटला
sakal

बोलून बातमी शोधा

pune

मोबाईलच्या नादात कॉंक्रीट मिक्सर पलटला

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: मोबाईल पाहण्याच्या नादात चालकाला अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने काँक्रीट मिक्सर पलटल्याची घटना पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत घडली आहे. या दुर्घटनेत चालकासह इतर दोघेजण थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

डोणजे फाटा ते खानापूर दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याचे व पुलांचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तसेच काही ठिकाणी कामासाठी रस्ता खोदण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणीही रस्त्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सिमेंट कॉंक्रिट घेऊन जाणारे वाहन खानापूर च्या दिशेने चालले होते. बाजूला जेसीबी उभा होता. काँक्रीट मिक्सर चा चालक मोबाईलवर पाहत वाहन चालवत होता. अचानक समोर अरुंद रस्ता आल्याने चालकाला अंदाज आला नाही व वाहन पलटले. सुदैवाने या अपघातातून चालकासह इतर दोघेही सुखरूप बचावले आहेत.

loading image
go to top