

उंड्री : नव्याने समाविष्ट झालेल्या उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी गावातील नागरिकांना पालिका प्रशासनाने पिण्याच्या पाणी मिळणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले असून, लष्कर पाणीपुरवठा केंद्र आणि केदारेश्वर पाण्याच्या टाकीतून जलवाहिनीद्वारे नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केदारेश्वर पाण्याची टाकी आणि लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी नुकतीच महापौर मुरलीधर मोहोळ आणि नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी नुकतीच केली. उंड्री, वडाचीवाडी आणि पिसोळी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा फायदा होणार आहे, अशी माहिती राजेंद्र भिंताडे यांनी दिली. याप्रसंगी डॉ. अश्विन खिलारे, सुभाष घुले, दादा कड, ओंकार होले, अविनाश टकले, उत्तम फुलावरे, श्रीकांत भिंताडे, अक्षय टकले उपस्थित होते.
महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी अभियंता अशित जाधव म्हणाले की, लष्कर पाणीपुरवठा विभागातून सहा इंच व्यासाची अस्तित्वात असलेली जलवाहिनी असून, ती अपुरी पडत आहे. त्याला समांतर १२ इंच व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. कडनगर चौक ते उंड्री चौकापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आहे. केदारेश्वर पाण्याच्या टाकीतून उंड्री चौकात जलवाहिनी आली, तर तेथून किंवा लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या जलवाहिनीतून पाणी देणे बाबत देखील विचाराधीन आहे. उं ड्री चौकातील उजव्या बाजूला असलेल्या गावठाणाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. उंड्री चौक ते कडनगर चौकापर्यंत १२ इंच व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. उंड्रीतील मुख्य रस्त्यावर जलवाहिनी टाकून त्यामधून सहा आणि चार इंच व्यासाच्या जलवाहिनी टाकल्या जाणार आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना बंद नलिकेतून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे काही भागात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.