The Dating Site Tricked 17 lakh rupees fraud of old man
The Dating Site Tricked 17 lakh rupees fraud of old manesakal

'डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का...' वृद्धाची १७ लाख रुपयांची फसवणूक

डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? असे म्हणत ७९ वर्षीय वयोवृद्धाची फसवणूक
Published on

डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? असे म्हणत ७९ वर्षीय वयोवृद्धाची गेल्या ६ महिन्यांपासून १७ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (The Dating Site Tricked 17 lakh rupees fraud of old man)

पुण्यातील वारजे भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७९ वर्षीय वयोवृध्द हे बँकेतून सेवा निवृत्त आहेत. त्यांना डिसेंबर महिन्यात एका अनोळखी नंबर वरुन श्रेया नावाच्या मुलीचा फोन आला. "तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का" असे विचारून त्या व्यक्तीने ज्येष्ठ व्यक्तीकडून काही रक्कम भरा असे सांगितले.

काही रक्कम भरल्यानंतर या वयस्कर व्यक्तीला नेहमी त्या नंबर वर फोन येत होते. त्या नंतर ही आरोपीने पैश्याची मागणी केली आणि तब्बल ७ महिने या वृद्ध व्यक्तीने आरोपीच्या बँक खात्यात १७ लाख रुपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी पोलिसात धाव घेतली.

याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com