esakal | पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपरमधल्या आकृत्याच झाल्या गायब; विद्यार्थ्यांना परीक्षेत अनेक अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपरमधल्या आकृत्याच झाल्या गायब; विद्यार्थ्यांना परीक्षेत अनेक अडचणी

पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपरमधल्या आकृत्याच झाल्या गायब; विद्यार्थ्यांना परीक्षेत अनेक अडचणी

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेत अभियांत्रिकीच्या एका पेपरमध्ये प्रश्‍नातील आकृत्याच गायब झाल्या होत्या. केवळ विद्यार्थ्यांना चार पर्याय दिसत असल्याच्या तक्रारी आजच्या परीक्षेत करण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेत याच पद्धतीच्या चुका झाल्याने गोंधळ उडाला होता. शुक्रवारी पुणे विद्यापीठाने तीन सत्रांमध्ये १४० विषयांची परीक्षा घेतली. त्यासाठी १ लाख ४२ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी १ लाख ३५ हजार ३६४ जणांनी (९४.९७ टक्के) परीक्षा दिली. पुणे विद्यापीठाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यावेळी चांगली तयारी केली आहे. १० एप्रिलपासून परीक्षा सुरू झाली असली तरी इतक्या दिवस विद्यार्थी संख्या कमी होती. मात्र, शुक्रवारपासून पुढे रोज विद्यार्थी संख्या १ लाखाच्या पुढे असणार असल्याने परीक्षेला गती आली आहे.

हेही वाचा: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात राज्य सरकार उचलणार वाटा; शासन निर्णय जाहीर

तिसऱ्या सत्रामध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा हायड्रोलिक अँड पेन्यूमेटिक्स या विषयाचा पेपर होता. यामध्ये आकृतीवर आधारित प्रश्‍न होते. पण ८ प्रश्‍नांमधील आकृती विद्यार्थ्यांना दिसत नव्हत्या. केवळ प्रश्‍नाचे पर्याय दिसत होते. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स तसेच हेल्पलाईवर तक्रार करून ही बाब निदर्शनास आणून दिली. सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना असे प्रश्‍न आले होते. तसेच यासह लॅपटॉपवर कॅमेरा सुरू न होणे, उत्तर सेव्ह न होणे अशा काही प्रमाणात अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, अभियांत्रिकीच्या परीक्षेत काही प्रमाणात अडचणी आल्या, इतर कोणत्याही विषयाला त्रास झाला नाही. शेवटच्या सत्रात ९८.८८ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अडचणी आल्या त्यांचे नुकसान होणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

अशी झाली परीक्षा

  • सत्र - अपेक्षीत विद्यार्थी- परीक्षा दिलेले विद्यार्थी

  • सकाळ- ५४,९५० -५०४४३ (९१%)

  • दुपार -२९,३९३ -२७,३९३ (९३.१४%)

  • संध्याकाळ - ५८१९७ ५-७,१९७ (९८.८८%

loading image
go to top