Pune News : हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा ज्ञानसागर खुला, प्रदर्शनातून अनुभवता येतेय भांडारकर संस्थेच्या कार्याची परंपरा

Gyansagar Exhibition Pune : प्राचीन हस्तलिखिते, युनेस्को नोंदणीकृत दस्तऐवज आणि दुर्मिळ ग्रंथांचा वारसा पुणेकरांना जवळून अनुभवता येणार आहे. तरुणांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित हे प्रदर्शन सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य पाहता येईल.
Gyansagar Exhibition Pune

Gyansagar Exhibition Pune

sakal

Updated on

पुणे : हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधनप्रकल्पांचा समावेश असलेले ‘ज्ञानसागर’ हे प्रदर्शन शनिवारपासून सुरु झाले आहे.

संशोधनाच्या क्षेत्रात गेली १०८ वर्षे कार्यरत असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेची ३०० हून अधिक प्रकाशने, तसेच महाभारत, भागवत, अथर्ववेद, कोरीव लेख, वैज्ञानिक हस्तलिखिते आणि खगोलशास्त्रीय उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी व पुणेकरांनी या पहिल्याच दिवशी भेट दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com