esakal | घरकाम करणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेचे मंगळसुत्र चोरले
sakal

बोलून बातमी शोधा

pune

घरकाम करणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेचे मंगळसुत्र चोरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेने गळ्यातून काढून ठेवलेले सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले. हि घटना ढोले पाटील रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 69 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ढोले पाटील रस्त्यावरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याकडे एक महिला घरकाम करण्यासाठी येत होती.

14 नोव्हेंबर 2020 या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादींनी गळ्यातील मंगळसुत्र काढून बेडरुममधील ड्रेसिंग टेबलवर ठेवले. त्यानंतर त्या आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेल्या. त्यावेळी घरकामगार महिलेने फिर्यादीची नजर चुकवून त्यांचे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.

loading image
go to top