
नारायणगाव : जिएमआरटी प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. नियोजित पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेमुळे या भागातील शेतमाल कमी खर्चात देशभरात पोहोचला असता, या भागातील शेतकरी सर्वसामान्य व भावी पिढीच्या जीवनात परिवर्तन झाले असते. नियोजित पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेचा मार्ग न बदलता जिएमआरटी राहावी. असा तोडगा शास्त्रज्ञांनी काढावा. यासाठी या भागातील शेतकरी , तरुणांनी लढा उभारावा. अन्यथा प्रगतीची दिशा देणारा हाता तोंडाशी आलेला घास निघून जाईल. असे आवाहन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले आहे.